चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचखेडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे चार एकरातील मका जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. दरम्यान कालच एका शेतकऱ्याची ऊस जळाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हि घटना घडल्याने तालुका हादरला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, “तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकरी कनैयालाला मुरलीधर पाटील यांच्या दडपिंप्री रस्त्यालगत असलेल्या शेतातील डीपीत आज अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाली. यामुळे पाटील यांच्या चार एकर शेतातील मका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.”
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी कालच चैतन्य तांडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक आग लागल्याने एक एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली होती. सदर घटना ताजी असताना पुन्हा हि घटना घडल्याने तालुका खरंच सुन्न झाला आहे.
पाटील यांनी गेल्या चार महिन्यापूर्वीच शेतात दोन अडीच लाखाचा ठिबक बसविला होता. त्यामुळे ठिबकासह एकूण ५ लाखाचा नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर घटनेचा पंचनामा झाला आहे किंवा नाही याबाबत अजून कळालेला नाही. मात्र प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सतत तालुक्यात शेतीसह घर जळण्याचे प्रमाणही वाढत आहे.
शेतकऱ्यांनी फोन केला होता. संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून कळविले त्यानुसार पंचनामासाठी अधिकारी दाखल झाले आहेत.