चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील जुनागवळीवाडा येथील भाचीच्या साखरपुड्याला गेलेल्या वकील दाम्पत्याच्या घराच्या लाकडी कपाटातून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, संजय विनायक नानकर (वय-५४) रा. जुनागवळीवाडा ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून वकीली व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह ते करीत असतात. दरम्यान भाचीचा साखरपुडा असल्याने नानकर हा परिवारासह १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून जळगाव येथे गेला. त्यानंतर तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर नानकर परिवार हे १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घरी परतले. त्यावेळी घराच्या मागील मुख्य दरवाजाचे कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर संजय नानकर यांनी घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाची पाहणी केली असता १५ हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅमची अंगठी, १५ हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे कानातील कर्णफुल, ९ हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅमचे क्रिस्टल कर्णफुल, ३ हजार रुपये किंमतीचे पाच चांदिचे जोडे व २ हजार रुपये रोखड असे एकूण ४४,००० रूपये रूपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. लागलीच संजय नानकर यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ४५४,४५७,३८० अशा विविध कलमान्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.