चोपडा येथे जागतिक महिला दिन उत्साहात

चोपडा प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त चोपडा नगरपरिषद, येथील श्री छत्रपती महाराज सभागृह येथे महिला दिन साजरा करण्यात आला.

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सर्व उपस्थित स्त्रियांचा यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला.याप्रसंगी महिलांचे सबलीकरण,सद्य स्थिती तसेच आवश्यक सुधारणा इ. कामी चिंतन करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्षा मानिषताई चौधरी, उपमुख्याधिकारी पूनम राणे,पाणी पुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे, नगरपरिषद आरोग्य समिती सभापती सुप्रिया सनेर, महिला व  बालकल्याण समिती सभापती दीपाली चौधरी तसेच मिनाताई शिरसाठ, शोभाताई देशमुख, सुरेखाताई माळी, संध्याताई महाजन, अश्विनीताई गुजराथी, काजी रुखसाना शाहीन सैय्यद, लताताई पाटील, विमलबाई देविदास साळुंखे, जहागिरदार नसीमबानो जहीरोद्दीन, सय्यद नुरअफजाबेगम अहसानअली, पुनम गुजराथी इ. नगरसेविका व इतर महिला उपस्थित होत्या.

 

Protected Content