चेक बाउन्स प्रकरणी एकाला दोन लाखाचा दंड व एक महिन्याची शिक्षा

97cb5f71 0eee 4920 8a75 a85dd016918e

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील एका व्यक्तीला चेक बाउन्स प्रकरणी दोन लाखाचा दंड व एक महिन्याची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

 

न्यायमूर्ती जी.व्ही.गंधे यांनी शुक्रवारी फिर्यादी संस्था जय किसान शेतीमाल फळे विक्रीच्या वतीने निकाल दिला. या संस्थेला फळ व्यापारी विनोदकुमार भोलानाथ जयस्वाल याने एक लाख ८ हजार आठशेचा चेक दिला होता. सदरचा चेक न वटल्यामुळे त्याच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली होती. सदर केसमध्ये आरोपीस एक महिण्याचा कारावास व चेकच्या रकमेच्या दुप्पट म्हणजे दोन लाख पुढील एक महिन्याच्या आत संस्थेस आरोपीने देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर रक्कम न दिल्यास 3महिने अधिकचा कारावास सुद्धा होऊ शकतो. संस्थेकडून ॲडव्होकेट रणजीत बी. पाटील यांनी कामकाज चालवले.

Protected Content