पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील एका सराफ्याच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. येरवडा भागात असणाऱ्या या सराफ दुकानाचे नाव महावीर ज्वेलर्स असे आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या दुकानातून चोरडयांनी तब्बल ३७२ ग्रॅमचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील येरवडा भागात असलेले महावीर ज्वलेर्स हे दागिण्याचे दुकानाचे मालक राकेश जैन आहे. राकेश जैन हे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एकटे होते. तेव्हा सहा चोर सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले असता यातील एकाने मुलीसाठी अंगठी दाखवा अशी मागणी केली. त्यानंतर अंगठी बघून त्याने ती अंगठी परत केली. त्यानंतर दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असे सांगितले. त्यानंतर जैन काऊंटरवरून उठले आणि शोकेसमधील मूर्ती काढायला गेले असता चोरटयांनी मूर्ती पाहिली पण घेतली नाही. इतर चोरटयांनी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतरांनी काउंटरच्या ड्रॉवरमधील ठेवलेल्या पॅकेटमधून सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याच्या ९ अंगठ्या असा एकूण२५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.