बोदवड प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून यातील पहिल्या नऊ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात राष्ट्रवादीला पाच शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. तर एका ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला विजय मिळाला आहे.
बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतनानाची मोजणी आज सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ झाली.
प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २११ मते यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक आठमध्येही राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.