ढाका-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांगलादेशमध्ये ‘आरक्षण हटाव’ मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलनामध्ये आणखी एका बड्या व्यक्तीला पद सोडावं लागलं आहे. बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबैदुल हसनयांनी राजीमामा दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी १० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. त्यांनी हसन यांना राजीनामा देण्यासाठी 1 तासांची मुदत दिली होती.
हुसैन यांची मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. ते माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. न्या. हसन यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या हंगामी सरकारशी चर्चा न करता सर्व न्यायाधिशांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आंदोलकांचा विरोध होता. त्यांनी ही बैठक एका कटाचा भाग असल्याचा आरोप करत सरन्यायाधिशांच्या राजीनाम्याची मागणी केली. या विरोधानंतर हसन यांनी बैठक रद्द केली होती.