अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात मागील वर्षातील अपूर्ण पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वेळीच संपूर्ण तालुक्यात दुष्काळी स्थिती जाहीर केली. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारी यंत्रणेने दुष्काळग्रस्त शेतकरी व गावकरी यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहेच. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांनी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना केलेल्या सूचनेनुसार आ.सौ. स्मिता वाघ यांनी संपूर्ण अमळनेर मतदार संघात दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे.
आजपासून (दि. ६) त्यांनी दौऱ्याला सुरुवात झाली असून तालुक्यातील टाकरखेडा, दहिवद खु., पातोंडा, गडखांब, धुपी, कचरे, नगांव खु, नगांव बु, येथे दिवसभरात दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी गावातील नागरिकांची भेट घेत दुष्काळी तसेच पाणीटंचाई समस्येबाबत माहिती घेवून प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आ. स्मिता वाघ यांनी दिले.
आ. वाघ पुढील दोन दिवसात तालुक्यातील इतर गावांना भेटी देणार असून याबाबत अहवाल मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना देणार आहेत व दौऱ्यानंतर स्थानिक प्रशासनाची बैठक घेवून उपाययोजनाचा आढावा घेणार आहेत. यावेळी आ. स्मिता वाघ यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य मिनाताई पाटील, पंचायत समिती सभापती वजाबाई भील, पंचायत समिती सदस्य विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बिरारी, हिरालाल पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, ए.टी. पाटील, प्रकाश पाटील, संगीता पाटील, घनश्याम पाटील, महेंद्र पाटील, सोनू पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.