Home राष्ट्रीय ‘भिकारी’ शब्द सर्च करताच दिसतो कटोरा घेतलेल्या इम्रान खानचा फोटो

‘भिकारी’ शब्द सर्च करताच दिसतो कटोरा घेतलेल्या इम्रान खानचा फोटो


imran khan

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | गुगल सर्च इंजिनवर ‘भिकारी’ शब्द टाइप करताच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत आहे. हा मॉर्फ केलेला फोटो असून त्यात इम्रान खान दाढी वाढलेल्या अवस्थेत भिकाऱ्याच्या वेशात हातात कटोरा घेऊन दिसत आहे. या प्रकारामुळे इम्रान खान सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

 

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. तेथे टोमॅटोपासून सोन्यापर्यंत अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. इम्रान यांनी यातून मार्ग काढण्यासाठी अनेक देशांकडे आर्थिक मदतही मागितली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे छायाचित्र मॉर्फ केल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या नेटीझन्सकडून मात्र यासाठी भारतालाच जबाबदार धरण्यात येत आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी अशा प्रकारचा खोडसाळपणा केल्याचेही पाकच्या नेटीझन्सचे म्हणणे आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खान यांना नेटिझन्स ट्रोल करत आहेत.


Protected Content

Play sound