Home Cities जळगाव शिवमहापुराण कथेच्या आयोजनासाठी तरसोद गणपती मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक

शिवमहापुराण कथेच्या आयोजनासाठी तरसोद गणपती मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री कुंदकेश्वर शिवपुराण कथा सेवा समिती, जळगाव यांच्या वतीने आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या आयोजनासाठी मंगळवारी १२ ऑगस्ट दुपारी २ वाजता तरसोद येथील
श्री गणपती मंदिरात विविध समित्यांच्या प्रमुख आणि कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत कथेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः पार्किंग व्यवस्था, भोजन नियोजन आणि स्वच्छता या तीन महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून उपस्थित समिती प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले. कथेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला समितीचे आयोजक ममता बोढरे-माळी, श्रीकांत बोढरे, अमोल चौधरी, गणेश आनंदा माळी आणि सुरेश वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश वाघ यांनी या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.

कथेदरम्यान होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य पार्किंगची व्यवस्था करणे आणि सर्वांना वेळेवर भोजन मिळेल याची खात्री करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, आरोग्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीमुळे शिव महापुराण कथेच्या आयोजनाला अधिक गती मिळाली असून, लवकरच अंतिम तयारी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound