मुंबई (विशेष प्रतिनिधी) राज्यातील वादग्रस्त मैत्रेय फायनान्स कंपनीतील गैरव्यवहाराबाबत उद्या (दि.२६) येथील विधान भवनात पहिल्या मजल्यावर कामकाज समिती कक्षात राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील उपस्थितीसाठीचे पत्र सर्व संबंधिताना पाठवण्यात आले आहे.
जिल्ह्यातून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने दुपारी १.०० वाजता संबंधीत अधिका-यांसमवेत पूर्वचर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या बैठकीस, संबंधितानी आवश्यक त्या कागद पत्रांसह उपस्थित रहावे, असे पत्र देण्यात आले आहे. या पत्राच्या प्रती पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, आमदार अनिल बाबर व आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.