Home धर्म-समाज फैजपुर स्वामीनारायण मंदिरात ‘श्री’ विसर्जन

फैजपुर स्वामीनारायण मंदिरात ‘श्री’ विसर्जन

0
32


फैजपूर, प्रतिनिधी । श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये श्रीगणेश चतुर्थी निमित्त गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्या गणपतिचे विसर्जन शुक्रवारी ७ व्या दिवशी करण्यात आले.

श्री स्वामिनारायण मंदिरात विसर्जन पूजेचा लाभ समस्त विश्वस्त मंडळ तसेच फैजपूर समस्त सत्संग समाज यांच्यावतीने कोठारी मधुकर फिरके गुरुजी यांनी घेतला. यावेळी श्रीगणेशजी यांची विधिवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर मोदक, गुळाचे लाडू, शिरा तसेच विसर्जनाच्या वेळी विशेष दाखवण्यात येणारा हरभरा दाळीचा प्रसाद आदिक नेवेद्य दाखवून आरती करण्यात आली. यावेळी शास्त्री भक्ती किशोर दास, शास्त्री सत्यप्रकाश स्वामी, मधुकर फिरके, दिलीप वारके, पुंडलिक जावळे, पंडित भंगाळे, राकेश तिवारी, वसंत चौधरी, देविदास फिरके, दत्तू चौधरी आणि रोहन फिरके उपस्थित होते.


Protected Content

Play sound