Home Cities जळगाव मेहरून तलावात भव्य मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात 

मेहरून तलावात भव्य मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात 

0
149

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील मेहरून तलावावर मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला औपचारिक सुरुवात झाली असून, यासाठी महापालिकेने व्यापक आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभारली आहे. भक्तिभावात न्हालेल्या वातावरणात मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यातील चार क्रेनचा वापर करण्यात येत आहे.

या क्रेनच्या साहाय्याने भव्य मूर्ती तलावाच्या काठावरून थेट पाण्यावर ठेवण्यात येत आहेत. यानंतर महापालिकेचे कर्मचारी, भक्तिभावाने मूर्तींचे विसर्जन करत असून, संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडते आहे. विसर्जनस्थळी पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या मोर्चा सांभाळलेला असून, प्रत्येक मूर्तीची नोंदणी करून नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन होत आहे.

महापालिकेने या ठिकाणी जलसुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. पाण्यात उतरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लाईफ बोट्स, लाईफ जॅकेट्स आणि पट्टीचे पोहणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी सतत पाण्यात नजर ठेवून कोणतीही अनिष्ट घटना टाळण्यासाठी दक्ष आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी सक्रिय असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत.

याच दरम्यान, “लाईव्ह ट्रेंड्स”ने काही भाविकांशी संवाद साधला. भाविकांनी महापालिकेच्या आणि पोलिसांच्या व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. “दरवर्षी इतकी चांगली आणि सुरक्षित व्यवस्था दिसली नाही,” असे सांगत अनेकांनी शांततेत आणि सुरक्षिततेत बाप्पाला निरोप देण्याचा आनंद व्यक्त केला.

एकूणच, मेहरून तलावावर सुरु असलेले विसर्जन सोहळे हे नियोजन, भक्ती आणि सुरक्षिततेचा समन्वय दाखवणारे उदाहरण ठरत असून, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नामुळे हे यशस्वीपणे पार पडत आहे.


Protected Content

Play sound