जळगाव प्रतिनिधी । शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात दि. 6 सप्टेंबर रोजी शाडू मातीच्या गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जन मुख्याध्यापक श्री. राजेंद्र खोरखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेत पाच दिवसांच्या मुक्कामी आलेल्या गणरायाचे पर्यावरण पूरक असे विसर्जन करण्यात आले. या पाच दिवसांमध्ये शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर हस्ताक्षर, निबंध, चित्रकला स्पर्धाचे विजेते विद्यार्थाचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी सचिव सुरेश बागुल, प्रा. महेंद्र देशमुख, स्काऊट शिक्षक किशोर पाटील, लता ईखणकर, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शेलजा पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी संजय पाटील, जगदीश शिंपी यांच्यासह विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खैरनार यांनी केले.