Home Cities जळगाव भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे

भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भीम आर्मी प्रमुख तथा दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर सहारनपुर येथे समाज कंटकांनी जीवघेणा हल्ला करुन त्यांना जीवेठार मारण्याचा जो प्रयत्न केला गेला तो या देशातील दलित नेतृत्व संपविन्याचा प्रकार आहे तेंव्हा त्या मारेकारी लोकांना ताबड़तोब अटक करावी अशी मागणी अनुसूचित जाति , जमाती अन्याय निवारण समिति प्रमुख मुकुंद सपकाळे यांनी केली.

या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले. मुकुंद सपकाळे म्हणाले की, संबधित गुन्हेगार त्वरित अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी जयसिंग वाघ यांनी देशातील एकूण भयावह परिस्थिति मांडून दलित समाजाने एकसंघ होवून संघर्षा करावा असे सांगितले. या प्रसंगी सत्यजीत साळवे , सुरेश तायड़े , महेंद्र केदार , मनोहर लोखंडे , हरिश्चंद्र सोनवणे , प्रतिभा शिरसाठ , चंदन बिरहाडे , रविन्द्र तायड़े , विजय करंदीकर , वाल्मीक सपकाळे , दिलीप सपकाळे साहेबराव वानखेडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound