चाळीसगाव (प्रतिनिधी)। जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी जैन मुनी पायी प्रवास करीत वेगवेगळ्या गावांना भेट देत असतात. अशाच एका जैन मुनींना शिरुर तालुक्यातील कवठे गावात एका समाज कंटकाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरुर पोलिसानी अज्ञातता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी सेना करीत आहे.
शिरूर येथून शिरूर-भिमाशंकर रोडवरुन मंचरकडे पाच जैन मुनी जात होते. त्यावेळी मुंजाळवाडी कवठे येमाई येथे एका समाज कांटकाने लोखंडी गजाने जैन मुनींना जबरी मारहाण केली. त्यावेळी त्याला रोखण्यासाठी काही स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मध्यस्थी करणाऱ्यांना देखील या समाजकंटकाने मारहाण केली. धर्माबरोबर मानवतेचा संदेश देत गावागावात एक वेगळी विचारधारा घेऊन जाणाऱ्या या जैन मुनींपासून कुणालाही कसलाही त्रास किंवा अडथळा नसतांना त्यांना झालेला मारहानीचा प्रकार अतिशय निंदनीय असून या घटनेचा संभाजी सेना तीव्र शब्दात निषेध करीत आहे. सदर मारहाण करणाऱ्या समाज कंटकास त्वरीत अटक करण्यात यावी अन्यथा संभाजी सेना तीव्र आंदोलन करेल. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक चाळीसगांव शहर तहसीलदार चाळीसगांव, जिल्हाधिकारी जळगांव मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना दिले आहे. निवेदनावर अविनाश काकडे, गिरीष पाटील, सुरेंद्र महाजन, सुनील पाटील, बंटी पाटील, प्रवीण पाटील, नारायण पाटील, कैलास ठाकरे, संदीप जाधव, रवींद्र शिनकर, भरत नेटारे, महेंद्रसिंग राजपूत, आधार महाले, नामदेव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.