यावल प्रतिनिधी । यावल येथून भुसावळकडे जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले असून रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारव्दारे करण्यात आली आहे.
यावल सार्वजनिक बांधकाम विभागास शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, शिसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेने म्हटले आहे की, काही दिवसापुर्वीच यावल तालुक्याचे माजी आमदार कै. हरीभाऊ जावळे यांच्या निधीतुन लाखो रुपये खर्च करून यावल ते भुसावळ या दरम्यानच्या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्त करण्यात आले होते. हे काम संबधीत ठेकेदाराच्या माध्यमातुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने यापुर्वी ही सदरच्या कामाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणंवत्ता व दर्जा चांगला व सुधारावी, अशी तक्रार शिवसेनेच्या माध्यमातुन करण्यात आली होती. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावल ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गांव ते जुना अंजाळे घाट पोलीस चौकी पर्यंतच्या पुर्ण रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली. संपुर्ण रस्तावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता खड्डेमय झाला. या मार्गावरील रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचे सेनेने म्हटले असुन या खड्डयातुन दुचाकी व इतर मोटर वाहन चालवितांना वाहनधारकांना पाठदुखी, कंबरदुखी व अंगदुखीचे शारीरिक आजारास सामोरे जावे लागत आहे. या आदीच मार्गावरील बनविलेला रस्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्याने सदरच्या कामाची पुनश्च नव्याने दुरुस्ती करून डांबरीकरण करणे गरजे आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यावलच्या वतीने संबधीत ठेकेदाराकडुन सदरच्या मार्गावरील निमगाव गावाजवळील व राजोरा फाटा ते अंजाळे गांव दरम्यानच्या रस्त्याची गुणवत्तापूर्वक दर्जा राखुन डांबरीकरण करावे. तसे न झाल्यास व प्रसंगी या मार्गावरील रस्त्यावर अपघात होवुन जिवित व वित्तियहानी झाल्यास संबधीत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे अधिकारी यास जबाबदार असेल, तरी तात्काळ या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेना आक्रमक भुमिका घेवुन आंदोलन करेल असा इशारा ही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
सा.बां. वि. यावलचे विकास जंजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , तालुका उपप्रमुख शरद कोळी, आदीवासी सेनेचे हुसैन तडवी, अजहर खाटीक, पप्पु जोशी, संतोष धोबी, भरत चौधरी, संतोष वाघ, सागर देवांग, योगेश पाटील, योगेश चौधरी, किरण बारी, नामदेव अडकमोल, अनिल पाटील, प्रविण लोणारी आदीं शिवसेनिकांच्या स्वाक्षरी आहेत.