नवी दिल्ली वृत्तसंस्था । काश्मीर प्रश्नावरून लुडबुड करणार्या पाकला विश्वविख्यात इस्लामी धर्मगुरू इमाम मोहंमद तौवहिदी खडे बोल सुनावले आहे. भारत हा पाकच नव्हे तर इस्लामपेक्षाही जुना असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले आहे.
ऑस्ट्रेलियातील रहिवासी इमाम मोहंमद तौवहिदी ही जगप्रसिध्द इस्लामी धर्मगुरू व विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी कलम-३७० रद्द केल्याने थयथयाट करणार्या पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या आशयाचे ट्विट करून त्यांनी जाहीरपणे भारताची पाठराखण केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि या पुढेही असणार नाही. पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचाच भाग आहे. मुस्लीमांनी हिंदू धर्म सोडून ते इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाहून जुना आहे. हे मान्य करायलाच हवे. या आधीदेखील त्यांनी काश्मीर ही हिंदूंची भूमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. यानंतर त्यांनी आता थेट पाकलाच खडे बोल सुनावत टिका केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
दरम्यान, दुसर्या ट्विटमध्ये इमाम तौवहिदी यांनी राहूल गांधी व सोनिया गांधींवरही टीका केली आहे. ते म्हणतात की, मोदींना विरोध करण्यासाठी गांधी माता व पुत्र हे शत्रूंची बाजू घेत आहेत.