वन विभागाच्या कारवाईत अवैध लाकुड जप्त

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील वनविभागाच्या कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांचे कडून मिळालेल्या बातमी नुसार डोंगर कठोरा शिवारात आडजात लाकुडची ट्रॅक्टर द्वारे अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने कारवाई करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा परिमंडळ स्टाफ व गस्ती पथक स्टाफ यांनी संयुक्त कारवाई करत सदर ट्रॅक्टर पकडले असून वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र.री.क्र ०३/२०२५.नुसार गुन्हा नोंदविला आहे.यात ६ घन मीटर लाकूड अंदाजे किंमत ७२oo व ट्रॅक्टर अंदाजे किंमत तिन लाख स्पये असा मुद्देमाल जप्त करन्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वृक्ष तोड (विनियमन)अधिनियम 1964 अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. *

नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही विना परवानगी वृक्ष तोड व त्याची अवैध वाहतूक करू नये.तसेच सदर कृती दिसून आल्यास तात्काळ वन विभागाला सूचित करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . सदरील कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज,उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख सर, मा.विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगिर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील,वन परिक्षेत्र अधिकारी,यावल पूर्व स्वप्नील फटांगरे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई दरम्यान आर. एम. जाधव, आर. बी. थोरात, रवि तायडे इत्यादी कर्मचारी सहभागी झालेत.

Protected Content