जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ रोडवर रिक्षातून गोवंश मांसाची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७० किलो मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील स्वामी नारायण मंदिरासमोर, दूरदर्शन टॉवरजवळ एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित आरोपी शेख जमीर मेहबूब (वय ५४, रा. उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) हा त्याच्या ताब्यातील बजाज कंपनीच्या रिक्षातून (क्रमांक एमएच १९ व्ही ७७४५) गोवंश जनावरांच्या मांसाचे लहान तुकडे करून विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात होता.

पोलिसांची कारवाई पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता त्यात सुमारे ७० किलो गोवंश मांस आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, राजेंद्र उगले, रामदास कुंभार, गिरीश पाटील, विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी आणि विनोद आस्कर यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार करत आहेत.



