डंपरमधून अवैधपणे वाळू वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे डंपरवर गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला वरणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून विना परवाना अवैधपणे मध्यरात्री डंपरमधून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पथकाने तिरंगा सर्कल चौकात कारवाई करत डंपर क्रमांक (एमएच १९ वाय २३१६) हा पकडला. चालक याला वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीस पथकाने वाळूने भरलेला डंपर हा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सुकलाल भोई वय-२८, रा. भोई नगर, भुसावळ, तुषार नेरकर आणि भटू नेरकर दोन्ही राहणार जळगाव या तिघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात राहुल भोई याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहे.

Protected Content