धरणगावात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले; कारवाई करण्यात पोलीसांचे दुर्लक्ष

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून याकडे स्थानिक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध धंद बंद करण्यातची मागणी परिसरातील नागरीकांकडून केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, धरणगाव शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लहान टपऱ्या टाकून अवैध धंदे जोरात सुरू आहे. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची नुकतीच बदली झाली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. दरम्यान, अवैध धंदे सुरू असून यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत धरणगाव पोलीस तक्रारी देण्यात आल्या आहेत. परंतू आर्थीक लाभापोटी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करीत आहे. त्याचप्रमाणे टपरीवर विनापरवाना गावठी हातभट्टी व देशी दारूची देखील विक्री केली जात आहे. सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

 

Protected Content