फैजपूर, प्रतिनिधी । शहरात बंद असलेले अवैध धंदे गेल्या एक ते दोन दिवसापासून पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र हे अवैध धंदे कोणी सुरू केले ? पोलीस विभाग या अवैध धंद्यावर कारवाई करणार का ? हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
लॉकडाऊन काळात फैजपूर व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय स्थानिक पोलीस विभागाने घेतला होता. मात्र लॉकडाऊन असतांना गेल्या एक ते दोन दिवसापासून शहरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरु झाले आहेत. हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आले ? यावर पोलीस विभाग कारवाई का करत नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. शहरात सुरू करण्यात आलेला सट्टा कुणाच्या आशीर्वादाने सुरू केला. शहरात सुरू असलेले अवैध धंदे पोलिस कारवाई करून बंद करतील का ? असा प्रश्न सामान्य नागरीकांमध्ये चर्चिला जात आहे.