रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील सुकी नदीतून तिन जेसिपीने दिडशे ट्रॅक्टराद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाची वाहतूक सुरू असून, महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर प्रकरणावर भाजप पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत आवाज उठवला.
आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. महसूल, कृषी, पंचायत समिती, घरकुल, भूमी अभिलेख आदी विभागांबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्या. यावेळी भाजपचे दुर्गादास पाटील यांनी, सुकी नदीतून दररोज तीन जेसीबीच्या साहाय्याने १५० ट्रॅक्टर ट्रॉलीने अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याचा आरोप केला. महसूल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच, उत्खननामुळे भविष्यात नदीच्या प्रवाहात बदल होण्याची भीती आहे.
उत्खननाच्या प्रश्नावर आमदार अमोल जावळे यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी वानखेडे, भाजप नेते सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर,भाजपा सरचिटणीस दुर्गेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल महाजन, मराठा समाज तालुकाध्यक्ष प्रा. उमाकांत महाजन, हरलाल कोळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, ॲड. सूर्यकांत देशमुख, दिलीप पाटील, पी. के. महाजन, अजिंक्य वाणी, तसेच सार्वजनिक बांधकाम, कृषी, नगरपालिका आणि एकात्मिक बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.