अवैध गौणखनिज उत्खननाने घेतला एकाचा बळी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खामखेडा येथील पुर्णा नदीपात्रातून गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, खामखेडा येथील पुर्णा नदीच्या पात्रातून शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर ,हायवा यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जात आहे. यातील काही डंपर मालकांकडे गौण खनिज उपशाची परवानगी असली तरी बहुतांश डंपर्स रात्रंदिवस २४ तास हे अवैध प्रकारात गाळ उपसा करून तो व्यावसायिक प्रयोजनाकरिता वीटभट्टी मालक अथवा शेतकर्‍यांना विकत आहेत. याबाबत विविध राजकीय तथा सामाजिक संघटनांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्याकडे सदर अवैध उत्खनन थांबवण्याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु तहसील कार्यालयातील गोणखणीत माफियांचा हस्तक असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावर सदर अवैध गुण खनिज वाहतूक युवर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.यामुळे या नदीच्या पात्रात अनेक डंपर्सची सातत्याने ये-जा सुरू असते.

दरम्यान, नदी पात्रातून गाळ घेऊन मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने आज नदी पात्राच्या जवळच एका व्यक्तीला चिरडले. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तर मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेतून अवैध गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

Protected Content