सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजात, देशात व अवघ्या विश्वात यशोशिखरावर पोहोचणारे मुठभर लोकच असतात की जे नेहमी उदात्त हेतूने प्रेरित, समर्पित व कठोर मेहनतीवर दृढ विश्वास ठेवणारी असतात. अपयश नव्हे तर शुल्लक लक्ष हाच खरा मोठा गुन्हा असून स्वतःला सिद्ध करून समाज, देश व विश्वासाठी आदर्शवत व्हा असा मौल्यवान सल्ला कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी दिला.
ते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या गारखेडा ता रावेर येथे आयोजित विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. त्यांनी युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी या विशेष थीमवर आधारित सात दिवसीय हिवाळी शिबिराच्या तृतीय दिवशी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी राष्ट्राच्या उथ्थानात युवकांचे योगदान या विषयावर आयोजित व्याख्यानात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ जयंत नेहते विभागीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांचीही उपस्थिती लाभली. कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून युवा कोणाला म्हणावे ? सद्यस्थितीत युवकांसमोरील विविध आव्हाने व युवकांमधील क्षमतेचा सदुपयोग करून देशाला अवघ्या विश्वाच्या अग्रस्थानी नेण्याचे सामर्थ्य व यासाठी आत्मविकास कसा साधून घ्यावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
विविध उदाहरणांच्या कसे सम्राट पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप सिंह, छत्रपती श्री शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्रीकांत जिचकर, गुकेश डी यांच्यासारखी समर्पक उदाहरणे देऊन उपस्थितांचे आत्मबळ वाढवले. स्वयंसेवकांनी व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवकांनी केले. याप्रसंगी विभागीय कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ जयंत नेहते यांनी शिबिरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, वेळेचे नियोजन, विविध कार्यक्रम, स्वयंसेवकांचा सक्रिय प्रतिसाद याबद्दल अभिनंदन व कौतुक करीत आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर अशा शिबिरात समर्पित वृत्तीने काम केले पाहिजे. समाजासाठी व देशासाठी तुमच्या हातून सर्वोत्तम कार्य घडावे यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा दिल्या. हिवाळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा हितेश फिरके राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, प्रा नफिसा तडवी महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, आरिफ तडवी, आशिष जहुरे, डॉ अमोल पाटील व स्वयंसेवकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.