Home क्राईम सुकमामध्ये नक्षलींनी घडवला स्फोट ; २ जवान गंभीर जखमी

सुकमामध्ये नक्षलींनी घडवला स्फोट ; २ जवान गंभीर जखमी


blast

सुकमा (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात, जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

 

भूसुरुंग स्फोटात जिल्हा राखीव दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विमानाने रायपूर येथे हलवण्यात येत आहे, अशी माहिती सुकमाचे सहायक पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिली आहे. दरम्यान, याआधी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यात सुरक्षा दलाचे १५ जवान शहीद झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound