Home Cities पाचोरा पाचोरा येथे उद्या आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन

पाचोरा येथे उद्या आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन


download 1

पाचोरा, प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे उद्या (दि.८) राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमात राज्याचे सहकार राज्यमंत्री आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या शिक्षकांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वात अधिक पटसंख्या असलेल्या शाळेच्या शिक्षकांचा व लोकसहभागातून दोन लाखांपेक्षा जास्त निधी जमा केलेल्या शाळेतील शिक्षकांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे.

हा कार्यक्रम शहरातील महालपुरे मंगल कार्यालयात सकाळी १०.०० वाजता होणार असून कार्यक्रमानंतर स्वरुची भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound