पाचोरा प्रतिनिधी । विवाहातील अनावश्यक खर्चाची नासाडी टाळून साखरपुड्यातच विवाह समारंभ पार पाडून एका कुटुंबाने समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
याबाबत वृत्त असे की, मोंढाळा रोड,पाचोरा येथील रहिवाशी संजय भगवान बावस्कर(पाटिल) हे आपले बंधू चि. विनोद याच्यासाठी सिल्लोड तालुक्यातील रहेमाबाद येथे मुलगी पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वडिल भगवान पाडुंरग पाटिल, मामा प्रभाकर तुकाराम पाटिल, हरिभाऊ तुकाराम पाटिल, शंकर जाधव सर लोहारीकर हेदेखील होते. दरम्यान, मुलगी पसंती नंतर दोन्ही कडच्या प्रमुख मंडळींनी लग्न आताच साखरपुड्यात लावून घ्या अशी विनंती मुलाच्या भावाला व वडिलांना केली असता त्यांनी देखिल सर्वानुमते सहमती दर्शवल्यानंतर लागलीच लग्नाची तयारी करून विवाह लावला. यामुळे दोन्ही कडील मंडळीचा विनाकारण होणारा खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत झाली. या आदर्श विवाहाचे समाजातून स्वागत करण्यात येत आहे.
अतीशय समझदार व्यक्ति हे कार्य करूं शकतात आपन सुधरलो ,तर जग सुधरेल ही भावना निर्माण झाली पाहीजे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनमचंद शिरभैये सुलतानपुर