Home Cities अमळनेर कृतीशील दीपकचा दिव्यांग तरूणीसोबत विवाह !

कृतीशील दीपकचा दिव्यांग तरूणीसोबत विवाह !

0
30

अमळनेर ईश्‍वर महाजन । सामाजिक सुधारणांबाबत फक्त बडबड न करता संदीप पाटील या तरूणाने एका दिव्यांग तरूणीसोबत विवाह करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.

अमळनेर येथील संदीप पाटील हा ध्येयवेडा युवक आहे. हिंदवी परिवार या संस्थेसोबत गडकोट भ्रमंतीसह अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्याने आजवर हिरीरीने सहभाग घेतला आहे. यासोबत सामाजिक सुधारणा ही आधी आपल्यापासून करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन त्याने दिव्यानी या तरूणीशी आदर्श विवाह केला. दिव्यानी ही सुशिक्षित व सुसंस्कृत घराण्यातील असून ती जन्मजात मूक आहे. अर्थात, संदीपने तिचा स्वीकार करून समाजाला आदर्श दाखवून दिला आहे.

२४ एप्रिल रोजी हा विवाह अमळनेरात पार पडला. याप्रसंगी हिंदवी परिवाराचे प्रमुख शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न थेटे, जिल्हाध्यक्ष पंकज दुसाने यांच्यासह आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, अ‍ॅड. ललीता पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती दिली. या दाम्पत्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound