जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ओकयनस ऍकवा टेक कंपनीचे संचालक, दिपक राठोड यांना नुकताच इंटरनॅशनल ग्लोबल बिजनेस अवॉर्ड मिळाला असून त्यात आणखी भर म्हणून प्रख्यात बॉलीवूड ऑफ हार्ट ऍण्ड क्वीन समजल्या जाणाऱ्या सिने अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते ओकयनस ऍकवा टेक कंपनीला आयकॉन इंडिया अवॉर्ड देण्यात आला आहे.
कंपनीचे संचालक दिपक राठोड यांना गौरविण्यात आले. ओकयनस एक्वा टेक प्रा.ली. कंपनी हि बेस्ट अलकालाईन वाटर कंपनी असून, संपूर्ण महाराष्ट्र मधून हेल्थ साठी ओकयनस कंपनीची निवड करण्यात आली आहे. आज 19 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथील पंचतारांकित जिंजर हॉटेल येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार हा एक आयकॉन इंडिया अवॉर्ड असून या कार्यक्रमासाठी वेग वेगळ्या देशातून कंपनीचे संचालक आले होते. सिने अभिनेत्री करिष्मा कपूर यांनी दादा राठोड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.