लोकसभेच्या २ जागाच्या बदल्यात मला कॅबीनेट मंत्रीपद मिळणार – रामदास आठवले

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीत प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची ताकद दाखवायची असते. या निवडणुकीत देखील ​​​​​​रिपाईला दोन जागा मिळाव्या अशी मी मागणी केली होती. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती.

मात्र, शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे आणि यावेळी मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले आहे, असा दावा रिपाई आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

Protected Content