लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा : अजित पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांसाठी आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळालं नाही. तसंच बारामतीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पराभवाचा वचपा काढण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. त्यातच शरद पवारांनी अजित पवारांसोर पुतण्या युगेंद्र पवार यांना उभे करत आव्हान आहे. त्यातच अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, २२ गावांचा दौरा करणार आहेत.

लोकसभेला ताईला मतदान करून साहेबाला खुश केलं, आता या निवडणुकीत मला खुश करा असे आवाहनच अजित पवारांनी बारामतीकरांना केलं आहे. गावकऱ्यांसह संवाद साधताना त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केली. लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे त्यामुळे मला मतदान करून मलादेखील खुश करा असं ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये प्रचारादरम्यान केलेल्या एका विधानाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीकरांनी ठरवल्याची आठवण अजित पवारांनी करून दिली.

Protected Content