पुणे (वृत्तसंस्था) मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अनेकवेळा भेटलो आहे. त्याला देखील दम भरलाय, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज पुण्यात एका वृत्तसमुहाच्या विशेष कार्यक्रमात संजय राऊत यांनी आपल्या मुलाखती दरम्यान, दाऊद इब्राहिमबाबतचा गोप्यास्फोट केला आहे.
संजय राऊत म्हणाले की,आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अडरवर्ल्ड काय होते हो आम्ही पाहिलेले आहे. त्या काळात मुंबईचे अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, असे सांगताना लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत.
तुमच्यात हिंमत असेल तर कोणीही तुमच्याकडे पाहू शकत नाही. मग तो कोणीही असो, पंतप्रधान असो अथवा गृहमंत्री असो. मी कोणालाच घाबरत नाही. मी दाऊद इब्राहिमला अनेकवेळा पाहिले आहे. त्याच्याशी बोललो आहे. मी त्याला एकदा दमदेखील भरला. मी पूर्वी मारामाऱ्यादेखील करायचो, त्यावर बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे. मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे मी फोटो काढले आहेत. त्याला दमदेखील दिला आहे. दाऊदपासून अनेक मोठ्या गुंडांचे मी फोटो काढले आणि त्या काळात सर्वांना दम दिला आहे. आज ते सर्व पळून गेले आहे. पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं मोठं साम्राज्य होतं. परंतु आता ते खलनायक आता राहिले नाहीत. दरम्यान, भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात वेगळं चित्र असते, असेही राऊत यांनी म्हटले.