जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकालगत जैन स्वाध्याय जवळील गडकरी नगरातील एक दुमजली इमारतीची महापालिकेतर्फे पाडण्याचे काम सुरु होते. या घरात राहणाऱ्या परिवाराने नगरसेवक कैलास सोनवणेंवर प्रॉपर्टी जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी घर पाडत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा खुलासा म्हणून नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्याच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही दस्तऐवज दाखवले. एवढेच नव्हे तर, महापालिकेच्या कामांसाठी मला ना. गिरीश महाजन यांचे नाव वापरण्याची मला गरज नसल्याचे देखील श्री.सोनवणे यांनी सांगितले.
२०१५ साली पंडित मोतीराम गायकवाड यांच्याकडून खरेदी केला असल्याचे श्री. सोनावणे यांनी यावेळी सांगितले. या खरेदी खतावर गायकवाड यांची मुलगी मंगला अरुण होळकर यांची साक्षीदार म्हणून सही असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नगरसेवक सोनवणे यांनी माझी बिल्डिंग तुटल्याने माझी आर्थिक नुकसान झाले असल्याचा दावा केला. महापालिकेच्या कामांसाठी मला ना. गिरीश महाजन यांचे नाव वापरण्याची मला गरज नाही. गायकवाड कुटुंबाने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे एकही पुरावा नाही. गायकवाड कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही, तसे होते तर चार वर्षात माझ्या विरोधात केस का दाखल केली नाही? असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला. पंडित गायकवाड यांच्या मुलाने वडिलांविरोधात दावा दाखल केला होता. तो दावा खारीज करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंडित मोतीराम गायकवाड यांची स्वकष्ट अर्जित प्रॉपर्टी आहे. त्यांनी ती मुलांना दिली नाही. मुलीच्या नावाने मुखत्यार पत्र केले होते. म्हणून आम्ही खरेदी खतांमध्ये मुलीला साक्षीदार घेतलेले आहे. त्यांच्या मुलाने त्यांचा सांभाळ केला नाही. त्यांनी आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे,अन्यथा आई वडील दुसरीकडे प्रॉपर्टी विकतातच. पंडित गायकवाड यांनी आमच्याशी संपर्क साधला यानंतर बैठक घेऊन त्यांचे कर्ज फेडून, त्यांचे कर भरून उरलेली रक्कम त्यांना देऊन आम्ही घर खरीदी केले आहे. त्यानंतर घरातील एक भाडेकरू होता, त्यास रीतसर खाली केले. त्याला चेकद्वारे पैसे देऊन रजिस्टर ताबा पावती केली आहे. पंडित गायकवाड यांना आम्ही फसवले नसून उलट त्यांना जागा विकू देत नाही, असा अर्ज पंडित गायकवाड यांनी आम्ही घर खरेदी करण्यापूर्वीच २०१३ मध्ये जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली होती. जर मी त्यांना फसवले आहे. तर चार वर्षात माझ्या विरोधात एकही केस का केली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.