मला बारामतीतून निवडणूक लढण्यास रस नाही; जय पवारांना लॉन्च करण्याच्या तयारीत अजित पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करूनही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१९ साली मुलगा पार्थ पवार आणि त्यानंतर २०२४ साली पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांना हा दुहेरी धक्का बसला होता. त्यानंतर बारामती विधानसभेत सख्खा पुतण्या युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याची बातमी समोर आली. युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अजित पवार गटातून जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येत होती. या मागणीवर आज १५ ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.

पुण्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले, “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”

 

Protected Content