Home Cities भुसावळ ‘हुतात्मा एक्सप्रेस’ला लाभले नवे रुपडे

‘हुतात्मा एक्सप्रेस’ला लाभले नवे रुपडे


hutatma exp

भुसावळ, प्रतिनिधी | पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही प्रवासी रेल्वे गाड़ी आजपासून (दि.२७) नव्या आकर्षक एल.एच.बी. रेकच्या रुपात धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका नव्या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे. या अद्ययावत व आकर्षक अशा गाडीची मागील आठवड्यात चाचणी घेण्यात आली असून ही गाड़ी आजपासून प्रवाशां च्या सेवेत दाखल होणार आहे.

 

या गाड़ीस जर्मन टेक्नोलॉजीने निर्मित केलेले एल.एच.बी. डबे जोडले आहेत. ही गाड़ी लाल रंगाची असून जुन्या गाड़ीपेक्षा ती अधिक आरामदायी आहे . दोन ब्रेक, लगेज कम जनरेटर कार, एक जनरल,14 चेयर कार, एक ए.सी. चेयर कार, एक स्लीपर असे एकुण १९ डबे या गाडीत आहेत. या गाड़ीचा प्रत्येक डब्यात एल.ई.डी. लाइटिंग आहे. ब्रेकिंग सिस्टम अद्ययावत असून डिस्क ब्रेकही लावलेले आहेत.


Protected Content

Play sound