Home धर्म-समाज यावलकर आदिवासी तडवी भिल समाजाच्या अध्यक्षपदी हुसैन तडवी 

यावलकर आदिवासी तडवी भिल समाजाच्या अध्यक्षपदी हुसैन तडवी 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावलमध्ये आदिवासी तडवी भिल समाजाकडून मोठ्या प्रमाणावर उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर यावलकर आदिवासी तडवी भिल समाजाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा जागतिक आदिवासी गौरव दिन हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा व अभिमानाचा प्रतीक मानला जातो. देशभरात विविध ठिकाणी पारंपरिक वेशभूषा, नृत्य, गीत-संगीत, हक्क व हक्कांची जाणीव करून देणारे कार्यक्रम घेतले जातात. त्याच धर्तीवर यावलमधील आदिवासी बांधव सुद्धा हा दिवस उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहेत.

यावल शहर व परिसरातील आदिवासी तडवी भिल समाजाने यंदा दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एक सशक्त कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी हुसैन जहांगीर तडवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत उपाध्यक्षपदी राजेश रुबाब तडवी व सलमा महंमद तडवी यांची उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून आरिफ सलीम तडवी यांची निवड झाली आहे.

कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीसाठी सचिव म्हणून शाहिद (मुन्ना) हुसैन तडवी व सहसचिव म्हणून शबाना नूरमहंमद तडवी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तर खजिनदारपदाची धुरा साहिल सर्फराज तडवी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटक म्हणून राजू तुराब तडवी, जरीना अब्दुल तडवी आणि सायरा राजू तडवी हे काम पाहणार आहेत.

या कार्यकारिणीत सदस्य म्हणून मुख्तार फकिरा तडवी, अजित हुसैन तडवी, युनुस (गुरु) अयुब तडवी, राजु निजाम तडवी व शब्बीर इस्माईल तडवी यांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण कार्यकारिणी एकजूटीनं दिनाच्या आयोजनासाठी कामाला लागली असून, यंदाचा सोहळा ऐतिहासिक आणि संस्मरणीय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound