जळगाव प्रतिनिधी । पत्नीकडे किरकोळ कामासाठी मागितलेले शंभर रूपये न मिळाल्याने संतापाच्या भरात पिकावरील फवारणीचे औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न मुक्ताईनगर येथे घडला. महिलेला अत्यवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात तातडीने उचारार्थ दाखल केले. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बबली प्रेमसिंग राठोड (वय-20) रा. मुक्ताईनगर ह्या पती प्रेमसिंग शेरशिंग राठोड यांच्यासह सासरे शेरसिंग राठोडे, सासू कलीबाई राठोड, जेठ रसाल राठोड आणि जेठाणी बेबी यांच्यासह एकत्र कुटुंबात राहतात. आज सकाळी 10 वाजता पती प्रेमसिंग राठोड याने पत्नी बबलीकडे कामासाठी 100 रूपये मागितले. मात्र बबलीकडे पैसे नसल्याने देण्यास नकार दिला. याचा राग प्रेमसिंग याला आल्याने त्याने घरात पडलेले पिकावर फवारणीचे विषारी औषध बळजबरीने बबलीच्या तोंडात ओतले. याला सासू, सासरे, जेठ आणि जेठानी यांचा देखील सहभाग असल्याचा आरोची बबलीने केला आहे. तीला अत्यवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात बबलीची मोठी बहिण रेखा विजय राठोड हिने तातडीने उपचारार्थ दाखल केले. पतीने बळजबरीने मला विषारी औषध पाजले आहे असा जबाब पोलीसांना दिला असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.