जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेस लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पतीकडून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५ मार्च रोजी पतीसह सासूवर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दादावाडी येथील माहेर असलेले सपना गोपाल मराठे (वय-२८) यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील नाव्हे येथील गोपाल तुकाराम मराठे यांच्याशी ५ मार्च २०१७ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या १ महिन्यानंतर पती गोपाल मराठे याने सांगितले की, मला लग्नात हुंडा कमी दिला व माझ्यासह माझ्या नातेवाईकांना पाहिजेत असा मानपान दिला नाही म्हणून सतत टोमणे मारने सुरु केले. त्यानंतर मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. यात सासूने देखील गांजपाठ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता सपना मराठे या जळगावातील दादावाडी येथे माहेरी निघून आल्या. यासंदर्भात शनिवारी ५ मार्च रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा पती गोपाल तुकाराम मराठे, सासु सुंदराबाई तुकाराम मराठे दोन्ही रा. नाव्हे तालुका चाळीसगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.