यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा पर्वतरांगेत खानदेशचे कुलदैवत, सातपुडा निवासिनी श्री मनुमातेच्या दर्शनासाठी आज रावेर यावल तालुक्यातील मातृशक्तीने दर्शनासाठी हजेरी लावली. आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून रावेर यावल तालुक्यातील महिलांना मनुमातेच्या दर्शनाला नेण्यासाठी मोफत एस टी बस उपलब्ध करून देण्याच्या या अभिनव कल्पनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रावेर, यावल बस स्थानकातून बसेस भरभरून मनुदेवी येथे आल्या.
सर्व महिला भाविक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आल्या होत्या. या सर्व महिलांचे स्वागत डॉ जागृती कुंदन फेगडे यांनी केले. एव्हढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या महिलांच्या दर्शनासाठी श्री मनुदेवी संस्थानचे सचिव नीलकंठ चौधरी, विश्वस्त सोपान वाणी, सुनील महाजन, सतिष पाटील, शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, लिपिक महेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.भूषण फेगडे, रितेश बारी, उज्वल कानडे, अक्षय पवार, कोमल इंगळे, सागर इंगळे, शुभम देशमुख, विनीत सोनवणे, सोनू नेमाडे, दिपक फेगडे यांनी संयोजन सहकार्य केले. सुमारे एक हजार पेक्षा जास्त महिलांनी या मोफत दर्शन योजनेचा लाभ घेतला.