गॅरेज दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील साई पेट्रोल पंपासमोरील न्यू लक्ष्मी मोटर सर्विसेस गॅरेजला अचानक आग लागल्याने गॅरेजचे शेड, स्पेअर पार्ट, मशिनरी सामानांसह, फर्निचर सीसीटीव्ही कॅमेरे आणि मारुती व्हॅन जळून सुमारे १५ लाख ३८ हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जितेंद्र सुभाष सचिन वय-४९, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ यांचे भुसावळ शहरातील साई पेट्रोल पंपासमोर न्यू लक्ष्मी मोटर सर्विसेस नावाचे गॅरेज दुकान आहे. दुचाकी व मोटारी दुरुस्तीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवारी २ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक गॅरेजला आग लागली. या आगीत स्पेअर पार्ट, शेड, मशिनरी सामान मारुती व्हॅन्सह इतर सामान असा एकूण १५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाली. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस परिसकर करीत आहे.

Protected Content