Home Cities अमळनेर शांततेचा गौरव पुन्हा एकदा! अमळनेरात अनंत चतुर्दशीला गणेश मंडळांचा होणार सन्मान

शांततेचा गौरव पुन्हा एकदा! अमळनेरात अनंत चतुर्दशीला गणेश मंडळांचा होणार सन्मान

0
200

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर शहर व तालुक्याच्या गणेशोत्सवात शांततेचा आणि सामाजिक सौहार्दाचा वारसा जपणाऱ्या गणेश मंडळांचा आणि कार्यकर्त्यांचा यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी गौरव करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे शांततेच्या मार्गाने विसर्जन मिरवणुका काढणाऱ्या मंडळांचा हा सन्मान ठरतो आहे एक सामाजिक सलोख्याचे प्रतीक.

दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या सायंकाळी दगडी दरवाजा येथे विशेष स्वागत मंच उभारण्यात येणार असून, विविध मान्यवरांच्या हस्ते शांतताप्रिय मंडळांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव केला जाईल. या उपक्रमासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, श्री मंगळग्रह सेवा संस्था, आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम, व्हॉइस ऑफ मीडिया, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर नगरपरिषद, महसूल विभाग आणि पोलीस स्टेशन अशा विविध संस्थांची संयुक्त जबाबदारी आणि सहकार्य लाभले आहे.

यंदाही मिरवणुका उत्साहात, पण पूर्णपणे शांततेत पार पाडाव्यात, आणि या शांततेच्या परंपरेला पुढे नेत “श्री सन्मानाचे” मानकरी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मिरवणुकीत शिस्त आणि शांततेचे पालन करत, इतर मंडळांसाठी आदर्श निर्माण करावा, असा सूर आयोजकांच्या निवेदनात आहे.

विशेष म्हणजे, पाचव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडणाऱ्या मंडळांनीही या दिवशी उपस्थित राहून सन्मान स्वीकारावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे. यामुळे मिरवणुकीतील सहभागाचे आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.


Protected Content

Play sound