Home आरोग्य गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये सुरक्षित इंजेक्शन वापराबाबत जनजागृती !

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये सुरक्षित इंजेक्शन वापराबाबत जनजागृती !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये नुकताच रुग्ण सुरक्षाअंतर्गत सुरक्षित इंजेक्शन सरावावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वैद्यकीय पद्धतींबद्दल शिक्षित करणे हे होते.

या जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या प्रा. प्रियंका गाडेकर, प्रा. सुमैया शेख, आणि प्रा. सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सुरक्षित सुईचा वापर, हातांची स्वच्छता, नीडल स्टिक इजा प्रतिबंध (सुई टोचल्याने होणाऱ्या जखमा टाळणे), आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट (वैद्यकीय कचरा व्यवस्थापन) यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.

याशिवाय, विद्यार्थ्यांनी वरील विषयांवर आधारित पोस्टर सादरीकरण, भूमिका (रोल-प्ले) आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘वन नीडल, वन सिरिंज ओन्ली वन टाईम’ (एक सुई, एक सिरिंज फक्त एकदाच) या घोषवाक्याचे महत्त्व प्रा. प्रियंका गाडेकर यांनी यावेळी अधोरेखित केले. रुग्णांना इंजेक्शन देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या विविध सूचना व घ्यावयाच्या काळजीबद्दलही त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम नर्सिंग विद्यार्थ्यांना रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील वैद्यकीय सेवांसाठी तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.


Protected Content

Play sound