घरकुल घोटाळा : जामीन अर्जावर पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला

devkar sonawane

 

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह इतर आरोपींच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होती. परंतू आज न्यायालयाने पुढील सुनावणीची 3 ऑक्टोंबर दिली आहे.

 

जळगाव शहरात नऊ ठिकाणी जागांवर बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा धुळयातील विशेष न्यायालयात सिध्द झाला होता. न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी निकाल देताना सुरेश जैन, राजेंद्र मयुर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ४९ आरोपींना वेगवेगळया कलमांमध्ये सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. दंडाची एकूण रक्कम १८१ कोटी २४ लाख ५९ हजार एवढी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता उच्च न्यायालयात निकालास आव्हान देण्यासाठी धडपड सुरु आहे. औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज दाखल करून घेत पुढील सुनावणी 3 ऑक्टोंबर म्हणजेच आजच्या दिवशी ठेवली होती. परंतू आज देखील यावर निर्णय येऊ शकला नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी उद्या ४ ऑक्टोंबर ठेवली आहे.

Protected Content