चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील इच्छापुर तांडा येथील एका घरात रात्री अचानक आग लागल्याने संसारोपयोगी वस्तूंसह १० हजाराची रोकड असा एकुण २५ हजार रुपयांचे मुद्देमाल जळून खाक झाले आहे. घटनेचा पंचनामा त्वरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील इच्छापुर तांडा क्रमांक २ येथील सदाशिव भावसिंग राठोड यांच्या घरात रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने संसार उपयोगी वस्तूंबरोबर १० हजारांची रोकड जळून खाक झाल्याने एकूण २५ हजार रुपयांचे मुद्देमाल जळून नष्ट झाले आहे. हि थरारक घटना घडल्याने सदाशिव राठोड यांचा संसार उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘अंत्योदय’जनसेवा कार्यालयातील व्यवस्थापक संदीप भावसार, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड व चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंदा राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची स्थिती जाणून घेतली. लागलीच या घटनेची माहिती संबंधित मंडळ अधिकारी व तलाठीला कळवून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश करण्यात आले. व्यवस्थापक संदीप भावसार व करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी जोपर्यंत पीडीत ग्रामस्थाला आर्थिक स्वरूपात मदत मिळत नाही. तोपर्यंत आमदार मंगेश चव्हाण यांचे’अंत्योदय’जनसेवा कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती दिली.