Home Cities जळगाव शॉर्टसर्किटमुळे घराची राखरांगोळी ; आमदार भोळेंनी भेट देवून केली पाहणी !

शॉर्टसर्किटमुळे घराची राखरांगोळी ; आमदार भोळेंनी भेट देवून केली पाहणी !

0
110


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या जळगाव भागातील पांझरापोळ पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका घरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन कुटुंबांचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

तत्काळ मदतीचा हात :
आगीमुळे घराची झालेली राखरांगोळी आणि कुटुंबांची झालेली दयनीय अवस्था पाहून आमदार राजूमामा भोळे यांनी तत्काळ वैयक्तिक पातळीवर मदतीचा हात पुढे केला. त्यांनी दोन्ही बाधित कुटुंबांना आवश्यक असणारे घरगुती साहित्य आणि महिनाभराचा किराणा माल भरून दिला. अचानक आलेल्या या संकटामुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांना आमदारांच्या या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे.

शासकीय मदतीसाठी पाठपुरावा :
केवळ तात्पुरती मदतच नव्हे, तर या कुटुंबांना पुन्हा उभे करण्यासाठी आमदार भोळे यांनी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. “आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय योजनेतून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

शासकीय मदतीचे आश्वासन :
या संकटसमयी लोकप्रतिनिधीने केवळ भेट न देता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल परिसरात आमदार राजूमामा भोळे यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “संकटकाळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा धीर आमदारांनी पीडितांना दिला.


Protected Content

Play sound