राज्यातील हॉटेल्स रात्री १२ तर दुकाने ११ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी

मुंबई प्रतिनिधी | काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आज राज्य सरकारने हॉटेल आणि उपहारगृहे रात्री १२ तर दुकाने ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली असून याबाबतचे निर्देश व नियमावली आज जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील  प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे सुरु करण्याची सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना सुरु ठेवण्याची वेळ सरकारने वाढवली आहे. राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली आज सरकारने जाहीर केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे व्यापरी तसेच सेवा क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यास मदत होणार आहे. सर्वांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे देखील सुरू होत असल्याने मनोरंजन क्षेत्राला उभारी मिळण्याची शक्यता आहे.

 

Protected Content