ब्रेकींग : नेपाळमध्ये भीषण बस अपघात : जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज नेपाळमध्ये भाविकांना घेवून जाणारी बस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नेपाळमध्ये आज शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये ४० प्रवासी स्वार होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ताजा वृत्तानुसार मयत १४ जणांपैकी काही जण हे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी तातडीने माहिती घेवून मदत कार्यात मदत केली. तर आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली. रक्षाताई या नेपाळमधील मदतकार्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक तुषारभाऊ राणे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.

टीप : ही बातमी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने आताच माहिती घेवून अपडेट केली आहे. लवकरच माहिती घेवून संपुर्ण बातमी आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असेल….

Protected Content