रावेर (प्रतिनिधि)। तालुक्यातील मोरव्हालच्या जंगलात बिबट्याने घोडीच्या फडश्या पाडल्याची घटना घडली असुन याबाबतची माहीती मिळताच वनक्षेत्रपाल आर.जी. राणे’ची टीम घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथील रहिवासी सुलेमान मेहबूब तडवी यांची घोडी गावाजवळ असलेल्या नाल्यात चरत होती संध्याकाळ होऊनही ती घोडी घरी आली नाही, म्हणून तिचा शोध घेतला असता ती 27 रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गावाजवळच्या सुलाबर्डी नाल्यात सिमेंटच्या नाल्या जवळ मृत्त अवस्थेत मिळाली. तिची वनविभागाकडून पाहणी केली असता तिच्या मानेजवळ वन्यप्राण्याने पकडल्याचे निशाण दिसत होते. आज जागेची तपासणी केला असता वन्य प्राण्याचे ठसे मिळून आली असुन हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी सहस्त्रलिंग, वनपाल संजय भदाणे मोरवाल, वनरक्षक गणेश चौधरी व इतर ग्रामस्थ यावेळी हजर होते.
बिबट्याने केली घोडी फस्त; नागरीकांमध्ये भीती
6 years ago
No Comments